पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार ७३४ वर, २४ तासांत ५४० नवे रुग्ण

लॉकडाऊन

भारतात गुरुवारी कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही साडेपाच हजारांपेक्षा अधिक झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार ही संख्या आता ५ हजार ७३४ वर पोहोचली आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या आणि डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांच्या संख्येचाही समावेश आहे. देशात आतापर्यंत  ४७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत १६६ मृत्यू झाले आहेत.

कोविड -१९: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'लर्न फ्रॉम होम'चा उपक्रम

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत कोरोना बाधितांचे ५४० नवे रुग्ण समोर आले आहेत तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातही कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. राज्यात १ हजार १३५ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. बुधवार दिवसाअखेरपर्यंतचा हा आकडा आहे.  महाराष्ट्रानंतर तामिळनाडूत संख्या जास्त आहे. तामिळनाडून रुग्णांची संख्या ही ६९० वर पोहोचली आहे.

वांद्रे भाभा रुग्णालयातील ४० कर्मचारी क्वारंटाइन

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपविणे शक्य नसल्याचे सूचकपणे म्हटले आहे. देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या गटनेत्यांशी त्यांनी बुधवारी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात येण्याची सूचक माहिती दिली. नरेंद्र मोदी येत्या शनिवारी ११ एप्रिलला पुन्हा एकदा देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. त्या दिवशीच लॉकडाऊन वाढवायचा की संपवायचा यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.