पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊननंतर कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला: आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल

देशामध्ये लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाता वेग कमी झाला आहे. लॉकडाऊनपूर्वी ३.४ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. मात्र  आता यासाठी ७.५ दिवस लागत आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

पालघरमधील घटना गैरसमजुतीतून, धार्मिक रंग देऊ नकाः ठाकरे

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ९ राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्यासाठी ८ ते २० दिवस लागत आहेत. तर ७ राज्यांमध्ये २० ते ३० दिवस लागत आहेत. केरळ आणि ओडिशा ही दोन अशी राज्य आहेत ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. 

फरार उद्योगपती विजय मल्ल्याला इंग्लंडमध्ये झटका

लव अग्रवाल यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये ८.५ दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट होत आहे. तर, कर्नाटकमध्ये ९.२ दिवस, तेलंगणामध्ये ९.४ दिवस, आंध्र प्रदेशमध्ये १०.६ दिवस, जम्मू-काश्मीरमध्ये ११.५ दिवस, पंजाबमध्ये १३.१ दिवस, छत्तीसगडमध्ये १३.३ दिवस, तमिळनाडूमध्ये १४ दिवस आणि बिहारमध्ये १६.४ दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट होत आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू

दरम्यान, काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्यासाठी २० ते ३० दिवसांचा कालावधी लागत आहे. अंदमान-निकोबारमध्ये २०.१, हरियाणामध्ये २१, हिमाचल प्रदेशमध्ये २४.५, चंदीगढमध्ये २५.४, आसाममध्ये २५.८, उत्तराखंडमध्ये २६.६, लदाखमध्ये २६.६ दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट होत आहे. तर, देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार २६ वर पोहचला आहे. 

पालघरमधील घटना गैरसमजुतीतून, धार्मिक रंग देऊ नकाः ठाकरे