पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाबाधित गायिका कनिका कपूरविरोधात गुन्हा दाखल

कनिका कपूर

कोरोना विषाणूची लागण झालेल्या प्रसिध्द गायिका कनिका कपूरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणा केल्यामुळे शुक्रवारी रात्री लखनऊच्या सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याबाबची माहिती स्वत: कनिकाने शुक्रवारी दुपारी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली होती.

कोरोना: केंद्राने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती केल्या निश्चित

लखनऊचे पोलिस आयुक्त सुजित पांडे यांनी सांगितले की, 'धोकादायक आजार पसरवल्याच्या आरोपाखाली कनिकाविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम २६९, २७० आणि १८८ अन्वये कनिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.' लखनऊचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे देखील पांडे यांनी सांगितले.

उपाययोजनांची गती वाढवली पाहिजे, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

गायिका कनिका कपूर लंडनवरुन भारतात आल्यानंतर ती अनेक ठिकाणी पार्टीमध्ये सहभागी झाली होती. लखनऊमध्ये ती ज्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती त्या पार्टीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजप खासदार दुष्यंत सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. कनिकाला कोरोना झाल्याचे कळताच वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह यांनी स्वत: विलन केले आहे. कनिका ज्या पार्टीत सहभागी झाली होत त्यामध्ये ३०० पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते. या सर्वांची तपासणी केली जात आहे.