पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिंकेतून ८ मीटरपर्यंत पसरु शकतो कोरोना विषाणू, संशोधकांचा दावा

स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे मागील २४ तासांत ४६२ जणांचा मृत्यू झाला. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेपासून ते विकसनशील असलेल्या भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने या विषाणूविरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबत आहे. कोरोना विषाणू कशामुळे पसरतो, तो होऊ नये म्हणून काय उपाय योजना आहेत. याची माहिती सरकार, प्रशासकीय यंत्रणा लोकांपर्यंत पोहोचवत आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी औषधांचा शोधही घेतला जात आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास सांगितले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूपासून बचावासाठी काही निर्देशही जाहीर केले आहेत. पण हे निर्देशही पुरेसे नसल्याचे समोर येत आहे. जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधातील दाव्यानुसार, कोरोनाबाधिताच्या शिंकेमधून तब्बल ८ मीटरपर्यंत विषाणू जाऊ शकतो. 

प्रेरणादायीःकोरोनाविरोधात लढण्यासाठी हेडकॉन्स्टेबलने दिले १० हजार

या संशोधनानुसार, जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन संस्थेने जे निर्देश दिले आहेत ते खोकला किंवा शिंक तसेच श्वसनाच्या प्रक्रियेतून निर्माण होणारे 'गॅस क्लाऊड’ याबाबतचे निकष १९३०च्या दशकातील मॉडेलवर आधारित आहेत. संशोधक लिडिया बुरुइबा यांनी या संशोधनातून इशारा दिला आहे की, खोकला किंवा शिंक यातून निघणारे सूक्ष्म थेंब २३ ते २७ फूट किंवा ७-८ मीटरपर्यंत जाऊ शकतात. सध्याचे निर्देश हे या थेंबाच्या आकाराबाबत जे आकलन आहे, त्यावर आधारित आहे. यामुळे कोरोनासारख्या घातक रोगांवरील प्रभावी उपचारांवर याचा परिणाम होऊ शकतो.

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या तिघांना जेलची हवा

दरम्यान, नव्या संशोधनात विषाणू ८ मीटरपर्यंत अंतर कापू शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आल्याने आता जगभर या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगला अधिक महत्त्व देऊन सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

शरद पवारांचा तरुणांना 'वाचाल तर वाचाल' चा मोलाचा सल्ला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus can travel up to 8 metres sneez from exhalation american medical association mit