कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जगातील जवळपास सगळेच देश प्रयत्न करीत असताना या संदर्भात सातत्याने नवनवीन माहिती पुढे येत आहे. विशेषतः संशोधकांना विषाणूच्या संक्रमणाबद्दल सातत्याने नवीन माहिती समजते आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या एका उच्चस्तरिय मंडळाने एक गंभीर माहिती संशोधनातून मांडली आहे. केवळ श्वास घेण्यातून आणि एकमेकांशी बोलण्यातूनही कोरोना विषाणूचे संक्रमण होत असल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू हवेतून संक्रमित होत असल्याचेही आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या संक्रमण स्वरुपामध्ये बदल झाल्याचेही शास्त्रज्ञांना आढळून आले.
परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणे शक्य नाही: केंद्र सरकार
अमेरिकेतील नॅशनल ऍकेडेमिज ऑफ सायन्स, इंजिनिअरिंग आणि मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. हार्वे फिनबर्ग यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, लोक जेव्हा श्वास घेतात आणि सोडतात त्यावेळी कोरोनाबाधित रुग्णांच्या माध्यमातून हा विषाणू हवेत मिसळतो. तो हवेत सक्रीय राहतो आणि दुसऱ्याला बाधित करू शकतो. मर्यादित स्वरुपाच्या संशोधनातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. पण त्यातून श्वासोच्छवासातून विषाणूचे संक्रमत होत असल्याचे दिसून आले आहे.
या संदर्भात एका विषाणूजन्य आजारतज्ज्ञांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने का होते आहे हेच यातून स्पष्ट होते. त्याचबरोबर अनेक लोकांना लागण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणे दिसत नसल्यामुळे या स्थितीत सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन हेच फैलाव रोखण्यासाठी प्रभावी अस्त्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाशी लढा, कोर्टाचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून
ज्या देशात लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता जास्त आहे. अशा देशांमध्ये हवेतून पसरणारे आजार हे जास्त घातक असतात. यासाठी भारतात नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.