पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधातील लढाईसाठी अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत

अक्षय कुमार

कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमारने २५ कोटींची आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना रोखण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी दिलेल्या आर्थिक निधीपेक्षा अक्षय कुमारकडून देण्यात येणारी रक्कम मोठी आहे. 

लॉकडाऊनमध्ये विराटच्या लूकसाठी अनुष्काने अशी घेतली मेहनत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगाने वाढणाऱ्या कोरोनाशी लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्विट करत देशातील जनतेने पीएम-केअर्स फंडात आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन केले. मोदींच्या या आवाहनानंतर अक्षय कुमारने ट्विट करत पीएम-केअर्स फंडाला २५ कोटींची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले.

रामायण, महाभारतनंतर शाहरूखच्या या मालिकेचे दूरदर्शनवर पुनर्प्रक्षेपण

अक्षय कुमारने ट्विट करत २५ कोटींची मदत करणार असल्याचे जाहीर केले. त्याने या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'ही तिच वेळ आहे जेव्हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा प्रश्न आहे. आपल्याला जे शक्य आहे ते करण्याची गरज आहे. मी माझ्या बचतीतून २५ कोटी रुपये पीएम रिलीफ फंडामध्ये देण्याचे वचन देतो.', असे सांगत अक्षय कुमारने चला जीव वाचवू या. जर जीवन असेल तर जग आहे, असे सांगितले. 

कोरोना : कनिका कपूरच्या प्रकृतीत सुधारणा, पण...