पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना वॉर्डमध्ये ड्युटी लावा; एम्समधील आरोग्य कर्मचाऱ्याचे प्रशासनाला पत्र

दिल्लीतील एम्स रुग्णालय

देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. अशामध्ये दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्याने स्वत:हून मला कोरोना वॉर्डमध्ये ड्युटी लावा अशी मागणी करत रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहिले आहे. कनिष्क यादव असे या आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव असून देशहितासाठी त्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. 

'कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही'

कनिष्क यादव यांनी सांगितले की, 'कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका असल्याने बरेच लोक घाबरू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मी त्यांच्यासोबत या वॉर्डमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे माझ्या कुटुंबियांना मी धोकादायक नोकरी करतो असे वाटत असून ते घाबरतात. मात्र जेव्हा आपले सैनिक सीमेवर जातात तेव्हा शत्रूच्या भीतीने ते परत येत नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसंच, देशहितासाठी मी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची संधी मी गमावू शकत नाही, असे देखील त्याने सांगितले. 

... आणि कोरोना प्रतिबंधक प्रोटेक्टिव्ह सूट्सचे उत्पादन देशात झाले सुरू

कनिष्क यादवन यांनी पुढे असे देखील सांगितले की, माझी ड्यूटी सामान्य शस्त्रक्रिया विभागात लावली आहे. रुग्णालय प्रशासनाने कोरोना वॉर्डमध्ये काम करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम तयार केली होती. यामध्ये माझे नाव नव्हते. त्यामुळे मी नाराज झालो होतो. तुमच्या खांद्यावर देशाची मोठी जबाबदारी आहे असे पंतप्रधानांनी सांगितले होते. अशा परिस्थितीत मी जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. हा विषाणू एक वैज्ञानिक लढाई आहे. याचा वैज्ञानिक मार्गाने पराभव केला जाऊ शकतो. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि धैर्याने काम करण्याची गरज आहे, असे कनिष्क यांनी सांगितले. 

कोरोनाशी लढाई: २.२ अब्ज लोकांकडे सतत हात धुवायला पाणीच नाही