पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी

देशातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा वाढला

देशातील कोरोना व्हायरस बाधीत रुग्णांची संख्या आणखी वाढली आहे. ओमनमधून एक आणि इराणमधून परतलेल्या दोन नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. या तीन रुग्णांसह भारतातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ३४ वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे  विशेष सचिव (आरोग्य) संजीव कुमार यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत देशातील ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नव्या रुग्णांमध्ये लडाखचे दोन तर तामिळनाडूतील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.  

INDvsAUS फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन PM अन् मोदींच्यात रंगला सामना

इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २१ लोकांनी आपला जीव गमावला असून दशभरातील मृतांचा आकडा हा ३ हजार ४९१ वर पोहचला आहे. मागील २४ तासांत १ हजार ७६ जणांना कोरानाने ग्रासले आहे. एएफपीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ९४ देशातील मिळून जवळपास १ लाख १ हजार ९८८ लोक कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली आहेत. यात ३ हजार ४९१ मृतांचा आकाडाही समाविष्ट आहे.

CBIvsCBI: राकेश अस्थानांना दिलासा, कोर्टाने क्लिन चिट

चीनच्या वुव्हानमधून निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसने सध्या जगभरावर संकट निर्माण केले आहेत. केंद्र सरकार यावरील उपाय योजनासंदर्भात सतर्क असून आरोग्य विभाग वाढता प्रादुर्भावर रोखण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. देशातील नागरिकांना परदेश दौऱ्यावर जाण्यास तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला सरकारने परिपत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.