पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Corona Virus: चीनमध्ये मृतांचा आकडा २३०० पार, WHOचे पथक वुहानमध्ये

कोरोना विषाणू

कोरोना विषाणूचे मुख्य केंद्र असलेल्या चीनमधील वुहान शहराचा जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तज्ज्ञांनी शनिवारी दौरा केला. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आणखी १०९ जणांचा मृत्यू झाला असून यामुळे आतापर्यंत  दगावणाऱ्यांची संख्या २३४५ इतकी झाली आहे. तर कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७६२८८ इतकी झाली आहे. ही माहिती चीनच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक, आज भारतात आणणार ?

चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी एकूण ३९७ लोकांना कोविड-१९चा दुजोरा मिळाला आहे. तर ३१ प्रांतीय स्तराच्या भागांमधून १०९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या (एनएचसी) नियमित अहवाला म्हटले आहे की, शुक्रवारपर्यंत या आजाराने एकूण २३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

अहवालानुसार, यामध्ये १०६ जणांचा मृत्यू या विषाणूचे केंद्र असलेल्या हुबेई प्रांतात तर एक मृत्यू हेबई, शांघाई आणि शिनजियांग प्रांतात झाला आहे. प्रांतीय आरोग्य आयोगाने सांगितले की, हुबेई प्रांतात शुक्रवारी १०६ जणांचा मृत्यू तर ३६६ जणांना याची लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. 

तब्बल ७० दिवसांनी शाहिन बागमधील एक रस्ता खुला झाला, पण...

डब्लूएचओच्या आरोग्य तज्ज्ञांच्या एका पथकाने हुबेई प्रांताची राजधानी वुहानचा दौरा केला. हा विषाणू डिसेंबरमध्ये एका सी फूड बाजारातून पसरला होता. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांनी आपल्या चिनी समकक्षांबरोबर एक संयुक्त तपास पथक बनवले आहे. या पथकाने आरोग्य संस्थांचा दौरा केला. 

हाँगकाँग येथील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने म्हटले की, या पथकात अमेरिका, जर्मनी, जपान, नायजेरिया, रशिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरियातील तज्ज्ञांचा समावेश आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Corona Virus WHO team visits Wuhan city as death toll in China coronovirus crosses over 2300