पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती केल्या निश्चित

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येत आहे. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटाझरच्या वाढत्या किंमतीविरोधात कडक पाऊल उचलत त्यांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी शुक्रवारी ट्विट करत ही माहिती दिली. २०० मिली सॅनिटायझरची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही. तसंच त्यांनी मास्कची किंमत देखील निश्चित करण्यात आली असल्याचे सांगितले.

कोरोना : कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्यांचा सरकारकडून शोध सुरु

राम विलास पासवान यांनी सांगितले की, 'कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून बाजारात विविध प्रकारचे मास्क, तसंच त्याच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि सॅनिटायझरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सरकारने याला गांभिर्याने घेत त्यांच्या किमती निश्चित केल्या आहेत.'

सरकारने मास्कच्या निश्चित केलेल्या किमतीबाबत पासवान यांनी सांगितले की, 'अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत २ आणि ३ प्लाय मास्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या कपड्याची किंमत १२ फेब्रुवारी २०२० रोजी जशी होती तशीच राहतील.' तसंच त्यांनी २ प्लाय मास्कची किरकोळ किंमत ८ रुपये आणि ३ प्लाय मास्कची किंमत १० रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, असे देखील सांगितले.

३१ मार्च नाही तर पुढील आदेश मिळेपर्यंत सूचनांचे पालन करा : अजित पवार

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे सॅनिटायझरसच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत. या किमतीवर रोख लावत सरकारने सॅनिटायझरची किमती निश्चित केल्या आहेत. 'सॅनिटायझरच्या २०० मिली बॉटलची किरकोळ किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त होणार नाही. तर इतर आकाराच्या बॉटल्सच्या किमतीही त्याच प्रमाणात राहतील. ३० जून २०२० पर्यंत या किमती देशभर लागू राहतील.', असे रामविलास पासवान यांनी सांगितले.