पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच; आतापर्यंत ३,०४२ जणांचा मृत्यू

चीनमध्ये कोरोनाचा कहर

चीनमध्ये कोरोना विषाणूने कहर केला आहे. कोरोनामुळे चीनमध्ये आणखी ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी १६ जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ३,०४२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

निर्भया प्रकरणः दोषी मुकेशची पुन्हा एकदा न्यायालयात धाव

चीनच्या वुहान प्रांतापासून सुरु झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात भितीचे सावट आहे. भारतामध्ये सुध्दा कोरोनाने कहर केला आहे. भारतात आतापर्यंत ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील १६ जण इटलीचे पर्यटक आहेत. कोरोनामुळे यावर्षी सर्वच ठिकाणी होळीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

हे सरकार गजनी चित्रपटातील नायकासारखे

कोरोनाचा कहर पाहता यावर्षी आयफा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. तर जगभरातील अनेक कंपन्यांनी कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहेत. 

राम मंदिर ट्रस्टसाठी शिवसेना आमदाराचे मोदींना पत्र