पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशव्यापी लॉकडाउनदरम्यान हवेचा दर्जा सुधारला, नासाने शेअर केले फोटो

नासाने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलेला फोटो

चीनच्या वुहानमधून जगभरात वेगाने संक्रमित होत असलेल्या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक राष्ट्रांवर लॉकडाउनची नामुष्की ओढावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाउनची घोषण केली होती. या कालावधीत देशवासियांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. पण कोरोनाविरोधातील लढा जिंकण्यासाठी अन्य कोणाही पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला हे कठोर पाउल उचलावे लागले असून यामुळे हवेच्या प्रदूषणालाही आळा बसला आहे. देशातील हवेच्या प्रदूषणात कमालीची घट झाली आहे.  

भारतात आतापर्यंत ५ लाखांहून कोरोना टेस्ट, २१७९७ जणांना लागण

लॉकडाउनमुळे वातावरण अधिक सुधारले आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने भारतातील हवेच्या प्रदूषणात सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. नासाने मागील चार वर्षांतील फोटो शेअर करत भारतातील हवेच्या प्रदूषणात आमुलाग्र बदल दिसत असल्याचे म्हटले आहे. नासाने मॉडरेट रिझोल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडियोमीटर टेरा सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतातील दृश्य टिपले आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतातील हवेची गुणवत्ता कमालीची सुधारल्या उल्लेख नासाने केलाय. 

खूशखबरः ७८ जिल्ह्यात १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. सुरुवातीच्या टप्प्यात १४ एप्रिलपर्यंत केलेल्या लॉकडाउनचा कालावधी १९  दिवसांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयानंतर  ३  मे पर्यंत लॉकडाउनची स्थिती कायम राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या कालावधीत कारखाने, कंपन्या अनेक उद्योग बंद आहेत. एवढेच नाही तर वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Corona virus lockdown also affects air pollution NASA says airborne particles over northern India have dropped significantly