पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूतून बाहेर

बोरिस जॉन्सन

कोरोना विषाणूची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना अतिदक्षता विभागातून (आयसीयू) बाहेर काढण्यात आले आहे. डाऊनिंग स्ट्रीटने गुरुवारी संध्याकाळी ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, 'पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना संध्याकाळी आयसीयूतून बाहेर काढण्यात आले  आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली बोरिस यांच्यावर उपचार सुरु आहेत.' 

मुंबईत निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन, लॉकडाऊन प्रभावी करण्यासाठी SRPFची मदत

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आयसीयूमधून त्वरित बाहेर हलवण्यात आले ही मोठी बातमी आहे. बोरिस जॉन्सन लवकर ठीक व्हा.'

कोविड-१९: राज्यात एका दिवसात २५ जणांनी गमावला जीव, मृतांचा आकडा ९७ वर

दरम्यान, बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी त्यांचा कार्यभार स्वीकारला आहेत. ब्रिटनमध्ये गुरुवारी कोरोनामुळे ८८१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये आतापर्यंत ७,९७८ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ५१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या ३ आठवड्यांपासून लॉकडाऊन आहे.

कोरोनाच्या जागतिक संकटातही सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या 'नापाक'