पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूः अखेर चीनची परवानगी, भारत वुहानला विमान पाठवणार

कोरोना विषाणूः अखेर चीनची परवानगी, भारत वुहानला पाठवणार विमान

चीनची परवानगी मिळाल्यानंतर कोरोना विषाणूने प्रभावित वुहान शहरात भारतीय विमान पाठवले जाणार आहे. दि. २६ फेब्रुवारीला मदत साहित्य पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर तिथे फसलेल्या भारतीयांनाही त्याच विमानाने परत आणले जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 

सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच, गोंधळात विधेयक मंजूर

मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्रालयाने सुचित केले आहे की, वुहानसाठी दि. २६ फेब्रुवारीला हवाई दलाच्या विमानाचे उड्डाण करण्याची योजना आहे. वुहानमधून भारतीयांना घेऊन हे विमान २७ फेब्रुवारी रोजी परतेल. दरम्यान, चीनने आता भारतीय सैन्य परिवहन विमानाला मंजुरी दिली आहे, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

विराट म्हणतो, लाजिरवाणा पराभव डोक्यात ठेवणार नाही!

चीन सी-१७ सैन्य परिवहन विमान उड्डाणास मंजुरी देण्यास विलंब करत असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. हे विमान २० फेब्रुवारीला बीजिंग वरुन वुहानला जाणार होते. चीनने इतर देशातील विमानांना आपल्या नागरिकांना घेऊन जाण्यास परवानगी दिली होती. मात्र, भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले होते.

...तर कर्जमाफी द्यायला ४०० महिने लागतील: फडणवीस

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Corona virus: India will send aircraft to Wuhan on February 26 to bring back Indians after Chinese approval