पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्यांचा सरकारकडून शोध सुरु

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल

प्रसिध्द गायिका कनिका कपूरला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोनाबाधित कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या सर्वांची सध्या तपासणी केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना शोधून काढणे हे आमचे काम आहे. कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी सुरु आहे. कनिता राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भेटली होती. वसुंधरा राजेंनी स्वत:ला विलग केले आहे.'

३१ मार्च नाही तर पुढील आदेश मिळेपर्यंत सूचनांचे पालन करा : अजित पवार

कनिका कपूरला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती पसरताच लखनऊ, कानपूर आणि जयपूरमध्ये खळबळ उडाली आहे. कारण कनिका कपूर लंडनवरुन भारतात आल्यानंतर या ठिकाणी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. कनिका कपूर ज्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती त्या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजप खासदार दुष्यंत सिंह आणि उत्तर प्रदेशचे मंत्री प्रताप सिंह सहभागी झाले होते. यासर्वांची तपासणी करण्यात आली असून त्यांनी स्वत:ला विलग केले आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारचा आणखी एक महत्त्वाचा आदेश

लखनऊमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये ५०० पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते. यामध्ये अनेक दिग्गज नेते देखील सहभागी झाले होते. पोलिस आता सर्व लोकांची यादी तयार करत आहे. या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडन येथून भारतात आली होती. लखनऊ येथील ताज हॉटेलमध्ये ती थांबली होती. त्यानंतर शालीमार ग्रँड अपार्टमेंटमध्ये आयोजित केलेल्या एका पार्टीत ती सहभागी झाली होती. यावेळी तिच्या संपर्कात अनेक लोकं आली होती.