पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शेजारील देशातील नागरिकांनाही चीनमधून आणण्यास भारत तयार होता'

एस जयशंकर

चीनमधून आम्ही केवळ आपल्याच लोकांना नव्हे तर शेजारील देशातील लोकांनाही परत आणण्यास तयार होतो, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोरोना विषाणूबाबत दिली. भारताच्या सर्व शेजारी देशांसाठी आम्ही असा प्रस्ताव तयार केला होता. परंतु, मालदीवच्या केवळ ७ नागरिकांनी या प्रस्तावाचा लाभ घेणे योग्य समजले, असेही जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले. 

मुंबईत सामूहिक बलात्कार करुन तरुणीची हत्या, दोघांना अटक

एस जयशंकर राज्यसभेत म्हणाले की, भारताचे सुमारे ८० विद्यार्थी अजूनही वुहानमध्ये आहेत. यापैकी १० विद्यार्थी विमानतळावर आले होते. परंतु, स्क्रिनिंग केल्यानंतर चिनी अधिकाऱ्यांनी त्यांना ताप असल्याचे सांगत पाठवण्यास नकार दिला होता. भारतीय दुतावास सर्व विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वुहानमधून ३२४ भारतीयांना एअर इंडियाच्या मदतीने भारतात आणण्यात आले आहे. 

गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारत कोरोना विषाणूने प्रभावित हुबेई प्रांतातील पाकिस्तानी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा विचार करु शकतो. पाकिस्तानने अजूनपर्यंत अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे स्पष्ट केले. वुहान शहरात फसलेल्या शेकडो पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी त्यांचे पंतप्रधान इमरान खान यांना तेथून बाहेर काढण्याची विनंती केली आहे. 

कॅबमध्ये CAA वरील चर्चा प्रवाशाला पडली महागात, पोलिसांकडून चौकशी

पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी केलेल्या विनंतीविषयी प्रश्न विचारला असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले की, पाकिस्तान सरकारकडून आम्हाला यासंबंधीची कोणतीच विनंती आलेली नाही. पण जर अशी परिस्थिती आली तर उपलब्ध साधने लक्षात घेऊन यावर आम्ही विचार करु शकतो. 

डोंबिवली: वृध्द समलैंगिक जोडीदाराची हत्या करणाऱ्या तरुणाला अटक

दरम्यान, शनिवारी आणि रविवारी भारताने मालदीवच्या ७ नागरिकांसह ६५४ लोकांना वुहान येथून आणले होते. भारतीय विद्यार्थ्यांना आणल्यानंतर पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन आपल्या सरकारनेही असे केले पाहिजे, असे आवाहन केले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Corona virus EAM S Jaishankar in Rajya Sabha says We were prepared to bring back not only our people but also those from all our neighborhood