पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमध्ये कोरोनाने घेतला ३,२१३ नागरिकांचा बळी

कोरोना व्हायरस

चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे. या विषाणूने एकट्या चीनमध्ये ३ हजार २१३ नागरिकांचा बळी घेतला आहे. तर ८० हजार ८६० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की रविवारी चीनमध्ये १४ नागरिकांचा मृत्यू झाला. तर १६ जणांना कोरोनाची लागण झाली. सर्व मृत हुबेई प्रांतातील आहेत. 

सावध रहा! पुढचे पंधरा दिवस कसोटीचे: उद्धव ठाकरे

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ८३८ नागरिकांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ३ हजार ०३२ नागरिकांची प्रकृती गंभीर आहे. चीनमध्ये रविवारी मध्यरात्रीपर्यंत ८० हजार ८६० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये ९ हजार ८९८ नागरिकांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर ६७ हजार ७४९ नागरिकांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. तर ३ हजार २१३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

निर्भयाच्या दोषींनी ठोठावला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा

तसंच, कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या ९ हजार ५८२ नागरिकांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर रविवारी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवलेल्या १ हजार ३१६  नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. रविवारी हाँगकाँगमध्ये ४ नागरिकांचा मृत्यू झाला. मकाऊमध्ये १०, ताइवानमध्ये एकाचा मृत्यू झाला. हाँगकाँगमध्ये ८४, मकाऊमध्ये १०, ताइवानमध्ये २० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BCCI चे कार्यालय 'शटडाऊन'