पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनकडून भारतीय विमानाला परवानगी देण्यास जाणीवपूर्वक विलंब

भारतीय विमान

चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूने कहर केला आहे. या विषाणूंमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीनच्या वुहानमध्ये १०० भारतीय अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यास चीनने विलंब केला आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलालाचे सी-१७ हे विमान २० फेब्रुवारीला जाणार होते. मात्र चीनने परवानगी न दिल्यामुळे विमान पाठवण्यात आले नाही. शनिवारी अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.

महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटतो का?: मनसे

एका उच्च-स्तरीय सुत्राने सांगितले की, 'चीनने भारतीय नागरिकांना देश सोडण्यासाठी लागणारी परवानगी अद्याप दिली नाही. तसंच चीनने भारताच्या विमान पाठवण्याच्या प्रस्तावाला सुद्धा परवानगी देण्यास विलंब केला आहे. चीन जाणीवपूर्वक विमानास मान्यता देण्यास विलंब करत आहे.' मात्र चीनकडून या आरोपाचे खंडण करण्यात आले आहे. दोन्ही देशाचे अधिकारी यावर चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार आहेत. 

अक्षय्य तृतीयेला सुरु होऊ शकते राम मंदिराचे बांधकाम

दरम्यान, चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे आणखी ११८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या २ हजार २३६ झाली आहे. तर ७५ हजार ४६५ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूमुळे जगभारामध्ये भितीचे वातावरण आहे. चीनमध्ये इतर देशांचे अनेक नागरिक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न सुरु आहेत. 

'प्रहार जनशक्ती'च्या माजी जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या