पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू: केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन विलगीकरण कक्षात

भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही मुरलीधरन

वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे. या विषाणूमुळे आता देशभरातही भितीचे सावट आहे. अशात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांची कोरोना विषाणूची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे व्ही मुरलीधरन यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कात आल्यामुळे मुरलीधरन यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढचे काही दिवस ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.

कोरोना विषाणूमुळे राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन १४ मार्च रोजी एका बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्या बैठकीमध्ये स्पेनवरुन आलेले एक डॉक्टर सहभागी झाले होते. या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आल्यामुळे मुरलीधरन यांनी खबरदारी म्हणून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवस ते घरीच राहणार आहेत, अशी माहिती त्यांनीच दिली आहे. 

कोरोनावर खासगी रुग्णालयातही उपचार घेता येतील - आरोग्यमंत्री

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरन मंगळवारी भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत देखील सहभागी झाले नाहीत. केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २४ वर पोहचली आहे. यामधील तीन रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तर दुसरीकडे भारतामध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशामध्ये आतापर्यंत कोरोनाचे १२५ रुग्ण आढळले आहे. मंगळवारी मुंबईमध्ये एका कोरोनाबाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

कोरोनामुळे मुंबईत एका वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू