पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोफत अन्नधान्य आणि १००० रुपये देणार; बिहार सरकारची मोठी घोषणा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बिहार सरकारने मोठी घोषणा केली. राज्यातील जनतेला मोफत अन्नधान्य आणि १००० रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. सोमवारी नितीश कुमार यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतील. या बैठकीनंतर त्यांनी बिहारच्या जनतेसाठी मदत जाहीर केली.

कोरोना विषाणू : राहुल गांधींनी पंतप्रधानांना विचारले दोन प्रश्न

नितीश कुमार यांनी सांगितले की, 'बिहार सरकारने लॉकडाऊन भागातील सर्व रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब एक हजार रुपये आणि मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला. तसंच १००० रुपये थेट त्यांच्या खात्यात डीबीटीमार्फत हस्तांतरित केले जातील. या व्यतिरिक्त राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांना तीन महिन्याचे आगाऊ पैसे दिले जातील, असे नितीश कुमार यांनी सांगितले.

टाळ्या, थाळ्या वाजवून कोरोना जाणार नाही : मुख्यमंत्री

पहिले ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी नितीश कुमरांनी मोठी घोषणा केली आहे. या विद्यार्थ्यांना ३१ मार्चपूर्वी शिष्यवृत्ती दिली जाईल. तसंच, आरोग्य कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे अतिरिक्त मूलभूत वेतन देण्यात येईल, असे देखील नितीश कुमार यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बिहार सरकारने बस सेवा, हॉटेल, रेस्टॉरंट ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.