पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूः एअर इंडिया, इंडिगोच्या चीनला जाणाऱ्या विमानसेवा स्थगित

एअर इंडिया, इंडिगोच्या चीनला जाणाऱ्या विमानसेवा स्थगित

कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये भीषण परिस्थिती आहे. एअर इंडिया, इंडिगोसारख्या देशातल्या प्रमुख विमानसेवांनी भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या विमान सेवा स्थगित केल्या आहेत.  चीनमध्ये  कोरोनामुळे १३१ लोकांचे बळी गेले आहेत. तर हजारो लोकांना कोरानाची लागण झाली आहे.  कोरोनामुळे एअर इंडियाची विमानसेवा ३१ जानेवारी ते  १४ फेब्रुवारीदरम्यान  स्थगित करण्यात आली आहे. तर इंडिगोची भारत- चीन विमानसेवा १ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारीदरम्यान स्थगित करण्यात आली आहे. 

मनसेच्या ९ फेब्रुवारीच्या मोर्चाचा मार्ग ठरला

विमानसेवा रद्द करण्यात आल्यानं ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट काढले आहेत त्यांना तिकिटाचे संपूर्ण पैसे परत देण्यात येतील, अशी माहिती इंडिगोनं दिली आहे.  गेल्या नऊ दिवसांत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनमधून आलेल्या ३ हजार ७५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मुंबईबरोबरच दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, चैन्नई विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे. 

या रेल्वे मार्गावर सर्वाधिक बळी, २०१९ मध्ये १,७६३ प्रवासी मृत्युमुखी

चीनमध्ये कोरोना विषाणू आणखी घातक होत आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १३१ पर्यंत पोहोचली आहे.आतापर्यंत कोरोना विषाणूच्या ५३०० प्रकरणांना पुष्टी मिळाली आहे. जपानने आपल्या २०० नागरिकांना शहरातून एअरलिफ्ट केले आहे. अमेरिकेने २४० नागरिकांना हवाई मार्गाने बाहेर काढले आहे. तर भारत सरकारनेही आपल्या नागरिकांना बाहेर काढणार असल्याचे म्हटले आहे.