पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमध्ये कोरोनाने घेतला आणखी ६४ जणांचा बळी; मृतांचा आकडा ४२५

कोरोना विषाणू

चीनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूने एका दिवसामध्ये ६४ नागरिकांचा बळी घेतला आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये मृतांचा आकडा वाढून ४२५ झाला आहे. चीनच्या वुहानमधून पसरणाऱ्या या कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये तब्बल १४ हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

'कोरोना' राज्यावर ओढवलेली आपत्ती : केरळ सरकार

भारतामध्ये सुध्दा कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये एका आठवड्यामध्ये कोरोना तिसरा  विषाणूचे तीन रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयातील स्वतंत्र कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. हे तिन्ही रुग्ण चीनवरुन केरळमध्ये आले आहेत. केरळमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढल्यानंतर राज्य सरकारने कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या संकटाची चाहूल असल्याचे जाहीर केले. केरळमधील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

एल्गार परिषदप्रकरणात NIA कडून नव्याने FIR दाखल

चीन आणि हाँगकाँगनंतर आता मुंबई विमानतळावर सिंगापूर आणि थायलंडवरुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु आहे. प्रवाशांच्या तपासणीत मदत करण्यासाठी राज्य सरकारने भारतीय विमानतळ प्राधिकरणास २५ आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक उपलब्ध करून दिले आहे. तसंच, पश्चिम बंगाल सरकारने कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी दोन थर्मर स्कॅनर बसवले आहे. 

WC : भारतvsपाक सेमी फायनल कधी अन् कुठे पाहता येईल?