पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानमध्ये ४०७२ जणांना कोरोनाची लागण, ५६ रुग्णांचा मृत्यू

कोरोना विषाणू (प्रतिकात्मक छायाचित्र)

पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा प्रकोप वाढताना दिसत आहे. बुधवारी कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढून ५९ इतकी झाली आहे. देशात या विषाणूचा आतापर्यंत ४०७२ जणांना लागण झाली आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत २००० नागरिकांचा मृत्यू

पाकिस्तानमधील पंजाब प्रांत या विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे. येथे १५ जणांचा मृत्यू झाला असून २०३० जणांना याची लागण झाली आहे. सिंध प्रांत आणि खैबर पख्तूनख्वामध्ये कोरोना विषाणूमुळे १८-१८ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील संक्रमितांची संख्या क्रमशः ९८६ आणि ५२७ पर्यंत पोहोचली आहे. बलुचिस्तानमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू तर २०६ जणांना लागण झाली आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. २१२ जण यामुळे संक्रमित झाले आहेत. राजधानी इस्लामाबादमध्येही एकाचा मृत्यू झाला आहे. तिथे ८३ जणांना याची लागण झाली आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये २८ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. 

कोरोनाच्या लढ्यात मोठा दिलासा; लॉकडाऊनमुळे संसर्ग झाला कमी

दरम्यान, भारतातही बुधवारी देशभरातील कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढून ५१९४ झाली आहे. या विषाणूचे आतापर्यंत देशभरात १४९ जणांनी आपला जीव गमावला आहे. ४०१ जण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

CM ठाकरेंच्या १६० जणांच्या सुरक्षा ताफ्यावर क्वॉरंटाइनची वेळ!