पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूची खासगी लॅबमध्ये मोफत चाचणी व्हावीः सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालय

कोरोना विषाणूची मोफत चाचणी करण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केली आहे. खासगी लॅबमध्ये कोरोना विषाणूची मोफत चाचणी झाली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोरोना विषाणू संबंधित प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना योद्ध्याची उपमा देत त्यांना सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे. खासगी लॅबमध्ये तपासणीची प्रक्रियाही केली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोनाचं केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये ७६ दिवसांनी हटवलं लॉकडाऊन

कोरोना चाचणी आणि विषाणूला थोपवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कोरोना विषाणूदरम्यान डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. हे योद्धा आहेत आणि त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा खूप गरजेची आहे. 

कोरोना विषाणूची तपासणी खासगी लॅबमध्येही मोफत झाली पाहिजे. याबाबत योग्य ते आदेश दिले जातील, असेही न्यायालयाने म्हटले. 

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ९ वर; दोन नव्या रुग्णात वाढ

सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, केंद्र सरकार कोरोना विषाणूशी निपटण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. पीपीई कीटची सोय वेगाने केली जात आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह लोकांनी कोणाला प्रभावित करु नये, याची काळजी घेतली जात आहे.

तुषार मेहता पुढे म्हणाले की, वेतनातून कपात करण्याचे वृत्त चुकीचे आहे. केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना सरकारी आणि खासगी डॉक्टर्सच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करु नका अशी सूचना केली आहे.

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Corona Lockdown Supreme Court suggested centre to don no let private labs charge high amount for Coronavirus test