पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार?

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे.  (संग्रहित छायाचित्

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यावरुन केंद्र सरकारने विविध स्तरावर चर्चा सुरु केली आहे. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपासून तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. देशात ज्या पद्धतीने कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. ते पाहता लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. बहुतांश राज्यांनी या प्रकरणी केंद्रावरच निर्णय सोपवला आहे. 

जागतिक आरोग्य संघटना पक्षपाती, डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

आणखी दोन आठवडे वाढण्याची शक्यता

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी कोरोनावरुन उच्च अधिकार प्राप्त मंत्रिमंडळ गटाच्या बैठकीत देशभरातील स्थितीचा आढावा घेतला. बैठकीत आवश्यक वस्तूंच्या पुर्ततेसमवेत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत जे संकेत मिळाले, त्यानुसार लॉकडाऊनचा कालावधी आणखी २ आठवडे वाढवला जाण्याची शक्यता आहे. 

काही सवलत मिळण्याची शक्यता

देशाची अर्थव्यवस्था आणि इतर क्षेत्रांवर पडत असलेला प्रभाव पाहता लॉकडाऊनमध्ये काही दिलासा दिला जाऊ शकतो. जे लोक सध्या विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या ठिकाणावर पोहोचवले जाऊ शकते. पण ज्यांच्यावर उपचार किंवा कायदा-सुव्यवस्थेशी निगडीत लोकांना जिथे आहे तिथेच ठेवले जाऊ शकते. 

दरम्यान, बैठकीत लोकांना एखाद्या ठिकाणी एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी निगराणी वाढवली जाऊ शकते. विशेषतः धार्मिक स्थानावर कडक लक्ष ठेवले जाईल आणि गरज पडल्यास ड्रोनने लक्ष ठेवले जाईल.

डोनाल्ड ट्रम्प यांची नमती भूमिका, भारताच्या भूमिकेला पाठिंबा

कोण-कोणते मुख्यमंत्री लॉकडाऊनच्या बाजूने

मुख्यमंत्री शिवराज सिंह, उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव, योगी आदित्यनाथ, अरविंद केजरीवाल, अशोक गेहलोत हे लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने दिसत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Corona Lockdown Know How many days can lockdown period be extended Central Govrenment is Planning to extend lockdown