पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देय महागाई भत्ता रोखण्याची गरज नव्हती'

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशात लॉकडाउनची परिस्थिती ओढावली आहे. परिणामी जागतिक संकटाचा सामना करत असताना आर्थिक गणित देखील बिघडले आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार अनेक निर्णय घेत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी २०२० पासून देय असलेला महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. यावर माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची देय रक्कम तूर्त स्थगित

सध्याच्या घडीला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांबाबत मोदी सरकारने हा निर्णय घ्यायला नको होतो, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने जुलैपर्यंत महागाई भत्ता स्थगित केल्याच्या निर्णयावर मनमोहन सिंग म्हणाले की, सरकारी कर्मचारी आणि सशत्र दलाशी संलग्नित कर्मचाऱ्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची कोणतीही गरज नव्हती. देशातील ५४ लाख सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महागाई भत्त्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.  

खूशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२० पासून देय असलेली  रक्कम आणि १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ पासून देय असलेली महागाई भत्त्याची अतिरिक्त देय रक्कमही येत्या काळात देण्यात येणार नाही, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Corona Lockdown Former PM Dr Manmohan Singh what said on Centre freezing Dearness Allowance and Dearness Relief hike till July 2021