पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या खासादाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना विषाणूची अफवा पसरवल्याच्या आरोपावरुन भाजपचे खासदार सुभाष सरकार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष सरकार यांच्यावर सोशल मीडियावर पोस्ट करत दोन मृतदेहांच्या अंत्यसंस्काराबाबत अफवा पसरवल्याचा आरोप आहे.
अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आणखी उपाय
सुभाष सरकार यांच्याविरोधात बांकुडा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम (डीएमए) २००५ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष सरकार यांच्याविरोधात पोलिसांनी ही कारवाई मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या १५ एप्रिलच्या इशाऱ्यानंतर केली आहे. ममता बॅनर्जी यांनी इशारा दिला होता की, 'कोविड-१९ संदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना कायदेशी कारवाईचा सामना करावा लागेल.'
देशात कोरोनाचा वेग मंदावला, मागील १२ तासांत ६२८ नवीन रुग्ण
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. याठिकाणी आतापर्यंत कोरोनाचे ३१६ रुग्ण आढळले आहेत. तर १० कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर, देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १३ हजार ३८७ वर पोहचला आहे. तर कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यात वाढ झाली असून मृतांचा आकडा ४३७ झाला आहे.
चीनकडून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सुधारणा, मृतांची संख्या वाढली