पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लेकाला आणण्यासाठी आईचा स्कुटीवरुन १४०० KM प्रवास

आपल्या मुलाला आणण्यासाठी या मातेने तब्बल १४०० किमी स्कुटीवर प्रवास करुन मुलाला घरी आणले.

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेकजण देशाच्या विविध भागात अडकले आहेत. त्यांना आपल्या घरी जाता येईना. परंतु, या काळातही एका घटनेने सर्वांना मातेच्या पुत्रप्रेमाचे अनोखे दर्शन झाले. एका महिलेचा मुलगा लॉकडाऊनमुळे ७०० किमी लांब अडकला होता. आपल्या मुलाला आणण्यासाठी या मातेने तब्बल १४०० किमी स्कुटीवर प्रवास करुन मुलाला घरी आणले.

कोरोनाविरोधातील लढाईत भारताचे महत्त्वाचे पाऊल

स्कुटीवरुन १४०० किमी प्रवास

तेलंगणातील निझामाबाद येथे राहणाऱ्या ५० वर्षीय रझिया बेगम आपल्या स्कुटीवरुन ७०० किमी दूर नेल्लोरला गेला. तिथे त्यांचा मुलगा लॉकडाऊनमुळे अडकला होता. त्याला घेऊन त्या पुन्हा स्कुटीवरुन आपल्या घरी परत आल्या. रझिया बेगम निझामाबादमधील बोधन शहरात एका सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. रझिया आपल्या मुलाला आणण्यासाठी सोमवारी सकाळी स्कुटीवरुन निघाल्या. त्या मंगळवारी दुपारी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे पोहोचल्या. तेथून त्यांनी आपला १७ वर्षीय मुलगा मोहम्मद निझामुद्दीनला स्कुटीवरुन पुन्हा घरी आणले. बुधवारी सायंकाळी त्या आपल्या घरी पोहोचल्या. या दरम्यान रझिया यांनी तीन दिवसांत १४०० किमी अंतर पार केले. त्यांचा मुलगा नेल्लोर येथे आपल्या मित्राच्या घरी अडकला होता. 

वाधवान कुटुंबातील २३ जणांवर गुन्हा

एसीपींनी दिली होती विशेष परवानगी

लॉकडाऊनमुळे अशक्य असलेल्या या कामात बोधनचे सहाय्यक पोलिस आयुक्त व्ही जयपाल रेड्डी यांनी रझिया बेगम यांना मदत केली. रझिया यांनी आपल्या मुलाला परत आणण्यासाठी मंजुरी मागितली होती. रझिया यांचा अर्जावर जयपाल रेड्डी यांनी एका विशेष पत्रावर त्यांना मंजुरी दिली. हे पत्र दाखवल्यानंतर त्यांना प्रशासनाने अडवू नये, असा रेड्डी यांचा उद्देश यांचा होता. तरीही रझिया यांना अनेक ठिकाणी पोलिसांनी रोखले. परंतु, जयपाल रेड्डी यांच्या पत्रामुळे त्यांना सोडण्यात आले. त्यामुळे आपल्या मुलाला सुरक्षित घरी आणणे त्यांना शक्य झाले. 

मुंबईत निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन, लॉकडाऊन प्रभावी करण्यासाठी SRPFची मदत

रझिया यांच्या पतीचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा २०१९ मध्ये इयत्ता बारावी उत्तीर्ण झाला आहे. हैदराबाद येथे तो वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी तो आपल्या मित्राच्या घरी नेल्लोर येथे गेला होता. अचानक २३ तारखेला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि तो तिथेच अडकला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Corona Lockdown A Mother rides 1400 km on scooty to bring back son stranded in Andhra Pradesh