पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंजाबची चिंता वाढली! नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण

पंजाबमध्ये नांदेडवरुन आलेल्या भाविकांना कोरोना

नांदेडवरुन पंजाबला आलेल्या भाविकांमुळे कॅप्टन अरमिंदर सिंह सरकारची चिंता वाढली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी १० जिल्ह्यांमध्ये राहणारे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी पंजाबमध्ये कोरोनाचे ३५ नवी प्रकरणं समोर आली. त्यामुळे पंजाबमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३५७ वर पोहचला आहे. यामधील ९० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पंजाबमध्ये कोरोनाचे ३३ नवे रुग्ण सापडले. हे सर्व रुग्ण नांदेड येथील गुरुद्वारा येथून आले आहेत. 

कोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध

या भाविकांना नांदेड येथून पंजाबमध्ये आणताना दुर्लक्ष केले गेले. नांदेडवरुन आणताना भाविकांची कोरोना तपासणी केली गेली नव्हती. तसंच एका बसमधून ४०-४० भाविकांना आणण्यात आले होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले नाही. या भाविकांनी तब्बत १८०० किमी प्रवास एकत्र केला. ऐवढेच नाही तर पंजाबमध्ये आल्यानंतर सुद्धा या भाविकांची कोरोना तपासणी करण्यात आली नाही. त्यांना तसेच त्यांच्या घरी पाठवण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात पंजाबमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते. 

दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन आहे. पंजाबमधील काही भाविक नांदेड येथील गुरुद्वारा हुजूर साहिब येथे दर्शनसाठी आले होते. लॉकडाऊनमुळे ते नांदेडमध्येच अडकले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांना पुन्हा पंजाबमध्ये आणण्यात आले. सध्या ते आपापल्या घरी गेले आहेत. त्याशिवाय जैसलमेरमधील ३ हजार आणि राजस्थानच्या कोटा येथील १५२ विद्यार्थ्यांनाही राज्यात परत आणण्यात आले आहे.

धारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू