पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत पोलिस आणि वकिलांमध्ये हाणामारी, काही जण जखमी

तीस हजारी कोर्टातील घटनास्थळाचे छायाचित्र

उत्तर दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी दुपारी काही पोलिस आणि वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमध्ये काहींनी थेट पोलिसांच्या गाडीलाच आग लावून दिली. या ठिकाणी झालेल्या हाणामारीत आणि गोळीबारात काही जण जखमीही झाले आहेत.

पोलिसांनी आमच्यावर गोळीबार केला, असा आरोप वकिलांनी केला. पण पोलिसांनी अजून त्यांची बाजू मांडलेली नाही. त्यामुळे नक्की त्या ठिकाणी काय घडले हे स्पष्ट झालेले नाही. 

सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या ठिकाणची सुरक्षा वाढविली असून, समाजकंटकांनी परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये, म्हणून न्यायालयातील सर्व प्रवेश दरवाजे बंद करण्यात आले आहेत.