पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्येत भूमीपूजनाने सुरु होईल राम मंदिरची उभारणी

अयोध्येत भूमीपूजनाने सुरु होईल राम मंदिरची उभारणी

अयोध्यामध्ये भव्य राम मंदिराचा शिलान्यास केला जाणार नाही. पण शुभ मुहूर्तावर भूमीपूजन करुन मंदिर उभारणीचे कार्य सुरु केले जाईल. तत्पूर्वी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे २५ मार्चपासून नवीन तात्पुरत्या मंदिरात रामललाचे दर्शन सुरु होईल. येथे अवघ्या २६ फूट अंतरावरुन दर्शन सुरु होईल. तर आता जिथे रामलला आहेत, तेथील दर्शन ५२ फुटांवरुन केले जाते.

सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांविरोधात गुन्हा

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली. तात्पुरत्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी एक किमी ऐवजी अर्धा किमी चालत जाणे आणि रामललाचे दर्शन ५२ फूट ऐवजी २६ फूट केले जाणार आहे. त्याचबरोबर भक्तांसाठी दर्शनाचा वेळही वाढवण्यात येईल. सध्या दर्शनासाठी एक-दोन सेकंद वेळ मिळतो. तो एक-दोन मिनिट केला जाईल. त्याचबरोबर आरतीमध्ये भाविकांनाही सहभागी होता येईल. 

PM मोदी सोशल मीडियाला 'रामराम' करण्याच्या विचारात

चंपत राय म्हणाले की, भव्य श्रीराम मंदिर निर्मितीसाठी ३० वर्षांपूर्वीच शिलान्यास झाला आहे. आता केवळ भूमीपूजन होईल आणि त्याचबरोबर मंदिर उभारणीचे कार्य सुरु होईल. मंदिर उभारण्यासाठी तिथी आणि भूमीपूजनचा मुहूर्त तांत्रिक समितीचा अहवाल आल्यानंतर निश्चित केला जाईल. दि. २९ फेब्रुवारी रोजी अयोध्या ट्रस्ट निर्माण समितीची बैठक नृपेंद्र मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यामध्ये एनबीसीसीचे माजी अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक अरुणकुमार मित्तल आणि एल अँड टीचे प्रमुख अभियंता दिवाकर त्रिपाठी उपस्थित होते. या सर्वांनी गर्भगृह आणि मंदिर परिसराचा दौराही केला होता. 

'नटसम्राट' श्रीराम लागूंच्या नावाने महाराष्ट्र सरकार देणार पुरस्कार

चंपत राय यांनी सांगितले की, नवीन भव्य मंदिराचे वयोमान किमान ५०० वर्षे राहिल, अशा पद्धतीने उभारले जाईल. यासाठी मातीचे परीक्षण होणे गरजेचे आहे. तांत्रिक समिती याचे काम करत आहे. मंदिर काँक्रिटचे होणार नाही. कारण काँक्रिट बांधकामाचे वयोमान कमाल १०० वर्षे मानले जाते. त्याचबरोबर लोखंडालाही गंज चढण्याचा धोका असतो. मंदिराची उभारणी राजस्थानी गुलाबी दगडांनी (सँड स्टोन) केली जाईल. राष्ट्रपती भवनची निर्मिती यातूनच केली आहे.