पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसने PM मोदींना पाठवली संविधानाची प्रत

काँग्रेसने PM मोदींना पाठवली संविधानाची प्रत

काँग्रेसने देशाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत पाठवली. देशाची फाळणी करण्यापासून वेळ मिळाला तर हे निश्चित वाचा, असा शब्दांत त्यांच्यावर निशाणाही साधला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून पंतप्रधानांना संविधानाची प्रत पाठवण्यात आली आहे. त्याची किंमत १७९ रुपये आहे आणि त्याचे पेमेंट मोड हे 'पे ऑन डिलेव्हरी' म्हणजेच प्राप्तकर्त्यालाच पैसे द्यावे लागतील. ही प्रत केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर पाठवण्यात आली आहे.

भारतात मुसलमानांवर कधीही अत्याचार झाला नाहीः आरएसएस

काँग्रेसने पंतप्रधानांना संविधानाची प्रत पाठवल्याची पावती शेअर करत म्हटले आहे की, प्रिय पंतप्रधान, तुमच्यापर्यंत लवकरच संविधानाची प्रत पोहोचत आहे. तुम्हाला देशाची फाळणी करण्यापासून वेळ मिळाल्यास कृपया संविधान वाचा. 

राज्यात शिवभोजन थाळी सुरु

सीएएवरुनही काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, सर्व नागरिकांना संविधानाच्या कलम १४ नुसार समानता प्राप्त करण्याचा अधिकार आहे, हे भाजपला समजलेले नाही. सीएएमध्ये या कलमाचा संपूर्णपणे उल्लंघन करण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Constitution of India is reaching you soon please do read it Congress Gift To PM narendra Modi on Republic day