पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघातानंतर राहुल गांधींची भाजपवर उपरोधिक टीका

उन्नाव पीडितेच्या गाडीला रविवारी अपघात झाला

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता आणि तिचे कुटुबीय असलेल्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्यानंतर आता या प्रकरणावरून भाजपचे आरोपी आमदार कुलदीप सेनगर यांच्याकडे पीडित मुलीच्या आईने बोट केले आहे. आम्हाला संपविण्याचा कट आखण्यात आल्याचे पीडितेच्या आईचे म्हणणे आहे. दुसरीकडे याच प्रकरणावरून काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर उपरोधिक टीका केली आहे. 

गिरीश महाजन हे देशातील मोठे नेते, संजय राऊत यांचा टोला

सोमवारी एक ट्विट करताना राहुल गांधी यांनी लिहिले आहे की बेटी बचाओ-बेटी पढाओ... भारतीय महिलांसाठी एक नवा धडा. बलात्कार केल्याप्रकरणी भाजपचा आमदार आरोपी असेल, तर प्रश्न विचार नका. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला.

रविवारी पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबिय रायबरेलीला जात असताना हा अपघात झाला. अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून, पीडित मुलगी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले आहेत. पीडितेच्या आईने म्हटले आहे की, कुलदीप सेनगरचा या अपघातामध्ये हात आहे. तो कायम आम्हाला धमक्या देत होता. सेनगर सध्या तुरुंगात असला, तरी त्याच्याकडे मोबाईल आहे आणि तोच आतून सर्व घडवून आणतो आहे, असे पीडितेच्या आईने म्हटले आहे.

CBSE बारावीच्या परीक्षा पद्धतीत महत्त्वाचे बदल

रविवारी जे घडले, तो केवळ अपघात नव्हता. आम्हाला सगळ्यांना संपविण्याचा डाव होता, असे पीडितेच्या आईने म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Conspiracy to wipe out my family Unnao rape survivors mother rahul gandhi also criticized