पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांचा ट्विटरला रामराम

दिव्या स्पंदना

काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना (राम्या) यांचे ट्विट अकाउंट डिलीट करण्यात आले आहे. त्यांनी स्वत: आपले अकाउंट बंद केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर दिव्या यांनी कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारामण यांचे अभिनंदन केले होते. हेच त्यांचे शेवटचे ट्विट होते.  

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं होते की, यापूर्वी अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी केवळ एका महिला मंत्र्यांनी बजावली होती. त्या इंदिरा गांधी होत्या. (१९७०) असा उल्लेख करत त्यांनी ही महिलांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले होते. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तुम्ही चांगले काम कराल, असा विश्वास देखील दिव्या स्पंदना यांनी व्यक्त केला होता.  

काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता घटनेच्या रक्षणासाठी लढतोय हे लक्षात ठेवा - राहुल गांधी

त्यांनी ट्विटर अकाउंट डिलीट केल्यानंतर त्या काँग्रेसला रामराम करणार का? अशा चर्चा जोर धरु लागल्या होत्या. मात्र खुद्द दिव्या स्पंदना यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. एएनआय वृत्तस्थेकडून त्यांना जेव्हा काँग्रेसच्या सोशल मीडियाचा पदभार सोडणार आहात का? असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे, असे म्हटले. नुकताच काँग्रेसने आपल्या नेत्यांना वाहिन्यांवरील चर्चासत्रात सहभागी होऊ न होण्याच्या सूचना दिल्या आहेत. काँग्रेसच्या रणनितीचा एक भाग म्हणून  स्पंदना यांनी ट्विटर अकाउंट डिलीट केले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  

१९४७ मध्येच हिस्सा दिला, भाजपचा ओवेसींवर पलटवार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congresss Divya Spandana leaves Twitter days after congratulatory tweet to Nirmala Sitharaman