पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींनी काहीच केले नाही सांगत अल्पेश ठाकोर यांचा राजीनामा

अल्पेश ठाकोर

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत मतदान केल्यानंतर लगेचच काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवून मी काँग्रेसमध्ये आलो होतो. पण दुर्दैवाने त्यांनी आमच्यासाठी काहीच केले नाही. पक्षामध्ये आमचा सतत अपमानच होत राहिला. यामुळेच मी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता, असे अल्पेश ठाकोर यांनी स्पष्ट केले. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

लवकरच नव्या रुपातील नाणी चलनात - अर्थमंत्री

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत कोणाच्या बाजूने मतदान केले, या प्रश्नावर उत्तर देताना अल्पेश ठाकोर यांनी मी माझा आतला आवाज काय सांगतोय, हे बघून मतदान केल्याचे जाहीर केले.

धवलसिंह झाला यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल सांगितले की, काँग्रेसमधील नेते माझा आणि आमच्या लोकांचा सातत्याने अपमान करत होते. पक्षातील वरिष्ठ नेते आमचे ऐकून घेत नव्हते. त्यामुळे एकूण सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मी राजीनामा दिला आहे.

अर्थसंकल्प २०१९: ३ कोटी दुकानदारांना मिळणार पेन्शन

दरम्यान, या दोघांनीही पक्षाच्या विरोधात मतदान केले असल्याचे राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे निरीक्षक अश्विन कोतवाल यांनी सांगितले.