पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर वाटलं गोमांस

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर वाटलं गोमांस (ANI)

गोमांसावरुन देशातील वाद अजून शमलेला दिसत नाही. केरळमध्ये पुन्हा एकदा गोमांसावरुन (बीफ) राजकारण पेटले आहे. केरळमधील प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या खाण्याच्या मेन्यूतून गोमांस हटवल्याचे वृत्त आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी कोझिकोड येथील मुक्कम पोलिस ठाण्याच्या समोर बीफ करी आणि रोटीचे वाटप केले. मेन्यूतून गोमांस हटवल्याच्या विरोधात केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस के प्रवीणकुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्याच्या बाहेर बीफ करीचे वाटप केले. 

शिवाजी महाराजांचे कार्य लाखोंना प्रेरणा देत राहिल - नरेंद्र मोदी

प्रसारमाध्यमांना सांगताना प्रवीणकुमार म्हणाले की, यातून केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांचा संघाकडील कल दिसून येतो. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी लगेचच पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि त्यानंतर भाजपशी मिळतं-जुळतं घेत लोकनाथ बोहरांना पोलिस महासंचालक केले होते. गुजरात दंगल प्रकरणात लोकनाथ बोहरा यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना क्लीन चिट दिली होती. आता बोहरा संघाचा अजेंडा लागू करत आहेत. काँग्रेस विजयन यांचा दुतोंडी चेहरा राज्यासमोर आणणार आहे.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला केरळ पोलिस विभागाने प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या बॅचच्या निर्धारित मेन्यूतून बीफ हटवण्याचे वृत्त निराधार असल्याचे म्हटले होते. 

मोदी माझे आवडते, पण भारताशी तूर्त व्यापार करार नाही - डोनाल्ड ट्रम्प

केरळ पोलिस विभागाने निवेदनात म्हटले की, मेस समितीच्या निर्णयानुसार त्यांनी निर्देश दिले होते की, आपापल्या परिसरात उपलब्ध साधनांसह चांगले भोजन तयार ठेवा. याचा उद्देश प्रशिक्षणार्थींना भोजनाच्या माध्यमातून आवश्यक ऊर्जा देणे आहे. या समितीत प्रशिक्षणार्थींचे प्रतिनिधी आणि पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

डोनाल्ड ट्रम्प भगवान राम आहेत का?; काँग्रेस नेत्याचा सवाल

यापूर्वीही केरळमध्ये गोमांसावरुन वाद झाला होता. यापूर्वीही केरळ युवक काँग्रेसच्या नेत्याने सार्वजनिकरित्या गाय कापल्यावरुन वाद झाला होता.