पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संधी मिळाल्यास पंतप्रधानपद घेऊ, काँग्रेसची कोलांटउडी

गुलामनबी आझाद

पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल पण मोदींना रोखणे हाच एकमेव उद्देश असल्याची भूमिका मांडणाऱ्या काँग्रेसने कोलांटउडी घेतली आहे. काँग्रेस पंतप्रधानपदासाठी दावा करणार नाही किंवा इच्छुक नाही हे खरे नाही असे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी स्पष्ट केले आहे. आझाद यांनीच पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत मोदींना सरकार बनवण्यापासून रोखणे हाच काँग्रेसचा उद्देश असल्याचे म्हटले होते. 

भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करु शकणार नाही : संजय राऊत

पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल पण मोदी नकोः काँग्रेस

आझाद म्हणाले की, काँगेस पंतप्रधानपदासाठी दावा करणार नाही किंवा ते या पदासाठी इच्छुक नाहीत, हे खरे नाही. साहजिकच आमचा पक्ष देशातील सर्वांत जुना आणि मोठा पक्ष आहे. जर सर्वांत मोठा पक्ष म्हणून सरकार चालवण्याची आम्हाल संधी दिली तर आम्ही ५ वर्षे सुरळित सरकार चालवू. 

देशद्रोहाचा आरोप असणाऱ्यांना संसदेत प्रवेश देऊ नका - संजय राऊत

काय म्हणाले होते आझाद

आम्ही याआधीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे. जर काँग्रेसच्या बाजूने निकाल आल्यास आम्ही नेतृत्व करु. एनडीएचे सरकार सत्तेत पुन्हा येवू नये हेच आमचे लक्ष्य आहे. सर्वसंमतीने घेण्यात आलेल्या निर्णयाबरोबर आम्ही जाऊ. जोपर्यंत आम्हाला पंतप्रधानपदाची ऑफर दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही याबाबत काही म्हणणार नाही आणि कोणीही ही जबाबदारी घेत असेल तर त्याला आडकाठीही आणणार नाही. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress will not claim or Congress is not interested in Prime Minister post is not true says Ghulam Nabi Azad loksabha election 2019