पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता राहुल आणि प्रियांका गांधींनी लोकांना केलं हे आवाहन

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात काँग्रेस पक्षाकडून सोमवारी दुपारी नवी दिल्लीत राजघाटावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या दोन्हींविरोधात काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली असून, अधिकाधिक नागरिकांनी राजघाटावर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केले आहे.

नुसत्या आडनावाने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची टीका

राजघाटावर सोमवारी दुपारी तीन वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात होईल. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार आहे. काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी राज्यघटनेतील काही तरतुदींचे वाचनही करण्यात येणार आहे. अधिकाधिक लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी स्वतः राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून सोमवारी सकाळी आवाहन केले.

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण केवळ भारतीय आहोत म्हणून चालणार नाही. अशा कठीण प्रसंगी तुम्ही भारतीय आहात हे दाखवून दिले पाहिजे आणि समाजात कोणालाही फूट पाडू दिली नाही पाहिजे. समाजात द्वेष पसरविणाऱ्यांविरोधात होणाऱ्या आंदोलनात माझ्यासोबत सहभागी व्हा. 

Jharkhand: १९ वर्षांच्या इतिहासात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress to hold protest at Rajghat against CAA today Rahul Priyanka urge people to join them