पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NRC बद्दल खोटे कोण बोलले? PM मोदी की शहा, काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा

दिल्लीच्या रामलीला मैदानात सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन करताना राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मुद्दा चर्चेतच नाही, असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधलाय. काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील भाषणाचा आणि अमित शहा यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसंदर्भात केलेल्या विधानाचा व्हिडिओ शेअर करत मोदी भारतवासियांसमोर खोटे बोलत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

पंतप्रधान म्हणाले, मोदीचा पुतळा जाळा पण देशाची संपत्ती नको

उलझे-उलझे से जनाब नजर आते हैं।
बातों में इनकी सारे जवाब नजर आते हैं।
संभलकर रहना इनसे मेरे प्यारे देशवासियों।
नियत में इनकी, इरादे खराब नजर आते हैं।

या शायरीच्या माध्यमातून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील खोट्या मुद्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. मोदींनी दिल्लीतील भाषणात काँग्रेसवर तोफ डागताना आसामशिवाय राष्ट्रीय नागरिकत्वाबाबत देशभरात कोणतीही चर्चा सुरु नाही, असे भाष्य केले होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यानंतर आता देशभरात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी होणार असल्याचे भाष्य केले होते. 

ममतादीदींना प.बंगालमधील नागरिक 'दुश्मन' का वाटतात?

सुधारित नागरिकत्वाच्या मुद्दयावरुन पंतप्रधानांनी केले भाष्य आणि काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यात तफावत दिसते. त्यांच्या या तफावतीतून भाजपचा चेहरा उघडा पडला आहे. देशवासियांनी या जोडगोळीपासून सावध राहण्याची गरज आहे, असे काँग्रेसने ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

CAA : शहरी नक्षली अन् काँग्रेस देशात अफवा पसरवत आहेत : PM मोदी

सुधारित नागरिकत्व कायदा हा देशातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. काँग्रेस आणि अन्य विरोधक या कायद्यासंदर्भात अफवा पसरवून राजकारण करत आहेत. एवढंच नव्हे तर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसंदर्भातील मुद्दा चर्चेत नसताना हा विषय लोकांच्या मनात विनाकारण बिंबवत असल्याचे मोदींनी म्हटले होते.