महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि स्टार प्रचारक राहुल गांधी परदेशात प्रवास करीत असल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होते आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून सोमवारी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडण्यात आली. लोकशाही व्यवस्थेमध्ये नेत्याचे वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य स्वतंत्र ठेवले पाहिजे. दोन्हीमध्ये गफलत केली जाऊ नये, असे काँग्रेसने म्हटले आहे.
शेतीला गती, उद्योगांना चालना देणारा महाआघाडीचा 'शपथनामा'
काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रणव झा म्हणाले, भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य वेगवेगळे आहे. प्रत्येकाचे वैयक्तिक स्वातंत्र्य हे कायम जपले पाहिजे. या विषयावरून जे राजकारण करू इच्छित आहेत. ते असे लोक आहेत ज्यांनी देशातील संस्था आणि सत्तेचा गैरवापर केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानावर प्रकाश जावडेकर म्हणाले...
देशातील दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक सुरू असताना काँग्रेसचे स्टार प्रचारक परदेशात गेले असल्यामुळे भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनीही राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचे समर्थन केले आहे. कोणाचेही वैयक्तिक आयुष्य त्याच्या सार्वजनिक जीवनाशी जोडले जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.