पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय संजय सिंहांचा राजीनामा, भाजपत जाणार

संजय सिंह पत्नी अमिता सिंह यांच्याबरोबर (छायाचित्रः संचित खन्ना)

काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाही आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सभागृहाला ही माहिती दिली. राज्यसभेत सरकारच्या वतीने तिहेरी तलाक विधेयक सादर करण्यात आले आहे. नेमके त्याचवेळी संजय सिंह यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

संजय सिंह हे बुधवारी भाजपमध्ये जाणार आहेत. आपली दुसरी पत्नी अमिता सिंह या काँग्रेस सोडणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांची पहिली पत्नी गरिमा सिंह अमेठीतून भाजपच्या आमदार आहेत. संजय सिंह यांनी लोकसभेला सुलतानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपच्या मेनका गांधी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

मी अपयशी ठरलो.. मला माफ करा, सिद्धार्थ यांचे भावनिक पत्र

गांधी कुटुंबीयांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे संजय सिंह यांना नंतर आसाममधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. १९८० मध्ये  नेहरु-गांधी कुटुंबाने जेव्हा अमेठीतून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संजय सिंह यांनी संजय गांधींना आपला पाठिंबा दिला होता.

अमेठीवर वर्चस्व असलेल्या संजय सिंह यांनी यापूर्वीही एकदा काँग्रेसची साथ सोडलेली आहे. त्यांना यावेळी खूप विचार करुन राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. गेल्या १५ दे २० वर्षांपासून काँग्रेसमध्ये संवादहीनतेसारखी स्थिती झाली आहे. मी विना अट भाजपत सहभागी झालो आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

उन्नाव प्रकरणावरून प्रियांका गांधींचा मोदींवर निशाणा, लक्ष घालण्याची मागणी

दरम्यान, संजय सिंह यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संसदेच्या वरच्या सभागृहातील एकूण सदस्यसंख्या घटून २४० होईल. २४५ सदस्यांच्या या सभागृहात आधीच ४ जागा रिकाम्या आहेत. आता संजय सिंह यांच्या राजीनाम्यामुळे ५ जागांची यात भर पडली आहे.