पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१०० दिवसांच्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन! राहुल गांधींचा सरकारला टोमणा

राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यपूर्तीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. विकासाशिवाय १०० दिवसांच्या कार्यकाळ पूर्तीसाठी अभिनंदन! अशा शब्दांत त्यांनी सरकारला टोला लगावला.

संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यात सरकारचे नेतृत्व कमी पडत असून दिशा आणि योजनांचा अभाव दिसून येतो, असा उल्लेखही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केलेल्या एनडीएने दुसऱ्या हंगामातील १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. 

ऑर्बिटरने विक्रम लँडरचे 'लोकेशन ट्रेस' करत टिपले छायाचित्र

काँग्रेस सचिव प्रियांका गांधी यांनी देखील भाजप सरकारवर तोफ डागली आहे. व्यापार ठप्प होऊन अर्थव्यवस्था कोलमडली असताना सरकार गप्प बसले आहे. खोटा प्रचार करुन देशाच्या जनतेची दिशाभूल सुरु आहे, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.