पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

RSSचे PM भारतमातेशी खोटं बोलत आहेत, डिटेंशन सेंटरवरुन राहुल गांधींचा टोला

राहुल गांधी (Raj K Raj/HT PHOTO)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी डिटेंशन सेंटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकताच दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या एका जाहीर सभेत काँग्रेस डिटेंशन सेंटरबाबत वाईट हेतूने खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला होता. पंतप्रधानांच्या या वक्तव्याला राहुल गांधी यांनी टि्वट करुन प्रत्युत्तर देत मोदी हेच खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.

...म्हणून सरकार चालवण्यासाठी कसरत करावी लागते: फडणवीस

राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ टि्वट करत म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पतंप्रधान भारतमातेशी खोटे बोलत आहेत. त्यांनी या टि्वटसोबत एक व्हिडिओही जोडला आहे. यामध्ये आसाममध्ये एक डिटेंशन सेंटर सुरु केल्याचा उल्लेख मोदी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या टि्वटला झूट झूट झूट असा हॅशटॅग वापरला आहे. 

NRC मुद्द्याला भाजपचा केवळ अल्पविराम, प्रशांत किशोर यांची टीका

दरम्यान, दिल्लीतील अवैध कॉलनी नियमित करण्यावरुन दिल्ली भाजपकडून रामलीला मैदानावर २२ डिसेंबरला रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात डिटेंशन सेंटरवरुन काँग्रेसवर आरोप केले होते. पंतप्रधानांनी रॅलीत म्हटले होते की, अजूनही जे कोणी भ्रमात आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून डिटेंशन सेंटरच्या अफवा खोट्या आहेत, देशाला उद्धवस्त करण्याच्या हेतूने त्या पसरवण्यात आल्या आहेत. हे खोटे आहे, खोटे आहे, खोटे आहे.

'...या पुढे यु-टर्न हा उद्धव ठाकरे टर्न म्हणून ओळखला जाईल'