काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी गुरुवारी संध्याकाळी आजारी पडल्यामुळे त्यांची शुक्रवारी हरियाणातील महेंद्रगढमध्ये होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी राहुल गांधी आता या ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'हिंदुस्थान टाइम्स'ला याबद्दल माहिती दिली.
बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर होत असलेली सोनिया गांधी यांची ही पहिलीच प्रचारसभा होती. पण तीही रद्द करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
प्रचाराचे शेवटचे दोन दिवस, राजकीय वातावरण तापले
हरियाणातील महेंद्रगढमध्ये दुपारी दोन वाजता राहुल गांधी यांची प्रचारसभा होईल. सोनिया गांधी काही अपरिहार्य कारणामुळे सभा घेऊ शकणार नाहीत, असे ट्विट हरियाणा काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले होते. पण काही वेळातच हे ट्विट काढून टाकण्यात आले.
#UPDATE Congress interim President Sonia Gandhi's rally in Mahendragarh,Haryana has been cancelled, Rahul Gandhi will address the rally instead https://t.co/yATQt7sIs2
— ANI (@ANI) October 18, 2019