पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी सरकारविरोधात काँग्रेस करणार देशव्यापी आंदोलन

सोनिया गांधी

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आक्रमक झाल्या आहेत. १५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले. गुरुवारी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची काँग्रेसचे सर्व नेते, महासचिव, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि आमदारांसोबत पहिली महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आरोप केले आहे. तसंच त्यांनी काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना केंद्रसरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत.

भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू 

या बैठकी दरम्यान सोनिया गांधी यांनी सांगितले की, जनतेने ज्या आशेने भाजपला पूर्ण बहुमत देऊन सत्ते आणले. त्या तुलनेने त्याच्याकडून काहीच कामं होत नाहीत. सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यांना घाबरवले, धमकावले जात असल्याचा आरोप सोनिया गांधी केला. अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. मात्र, सत्ताधारी या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेसने रस्त्यावर उतरुन  निर्भयतेने लढायला तयार झाले पाहिजे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. 

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला! दिल्ली दरबारात रंगणार

दरम्यान, केंद्रातील सत्ताधारी भाजप जनादेशाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. या सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेस पक्ष १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशभरात आंदोलन करणार आहे. यापूर्वी २० ते ३० सप्टेंबर या कालावधीत सर्व राज्यांमध्ये या विषयावरील परिषदा घेण्यात येणार आहे.

पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लष्कर प्रमुखांचा पाकला इशारा