पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिहार तुरुंगात सोनिया गांधींनी घेतली शिवकुमार यांची भेट

सोनिया गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री डी के शिवकुमार यांची तिहार कारागृहात भेट घेतली. शिवकुमार यांना इडीने मनीलाँडरिंगच्या एका प्रकरणात तीन सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यांची जामीन याचिका न्यायालयात प्रलंबित असून ईडीकडूनही त्यांची चौकशी सुरु आहे. 

शिवकुमार यांना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केलेली नाही. त्यांना  केंद्रीय संस्थांनी राजकीय द्वेषापोटी अटक केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. 

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले की, सोनिया गांधींची शिवकुमार यांच्याशी भेट म्हणजे पक्षातील लोकांना हा संदेश आहे की, पक्ष अशा प्रकरणात कारागृहात जाणाऱ्या नेत्यांच्या मागे उभा आहे. यापूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनीही तिहारमध्ये जात शिवकुमार यांची भेट घेतली होती. 

कोण आहेत डी के शिवकुमार
कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार यांनी अनेकवेळा आपल्या पक्षाचे संकटमोचक म्हणून भूमिका निभावली आहे. वर्ष २०१७ मध्ये गुजरात राज्यसभा निवडणूक, कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारमध्ये अनेकवेळा त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.