पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राफेलमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या मतावर मी आजही ठाम - राहुल गांधी

राहुल गांधी

राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या मतावर मी आजही ठाम असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. या कार्यक्रमानंतर संसद भवनातून बाहेर येताना राहुल गांधी यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी वरील मत मांडले.

राहुल गांधी म्हणाले, राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाला आहे, या मतावर मी आजही ठाम आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी राफेलचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. पण या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही राफेल खरेदी गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे, असे वाक्य राहुल गांधी बोलले होते. त्यावरून न्यायालयाने त्यांना खुलासा करण्याचे आदेश दिले होते. प्रचाराच्या वेळी उत्साहात माझ्या तोंडून तसे वक्तव्य केले गेल्याचे राहुल गांधी यांनी न्यायालयाला सांगितले होते. 

टॅक्सी, रिक्षाच्या भाडेवाढीची शक्यता, लवकरच निर्णय

भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात राफेल प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.