पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल यांच्यासोबतच्या भेटीत विलिनीकरणावर चर्चा नाही: शरद पवार

राहुल गांधी आणि शरद पवार

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस कार्यकारणीकडे सोपवल्यानंतर पक्षातील अनेक दिग्गज त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र पाहायला मिळाले. राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम असून ते कोणाला भेटायला तयार नसल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत होती.   

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

मात्र, आज (गुरुवारी) राहुल गांधी यांनी नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील या भेटीनंतर राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र पवारांनी हा चर्चेला तुर्तास पूर्णविराम दिला आहे. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पवारांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले. महाराष्ट्रातील निवडणुका आणि दुष्काळ निवारणाबाबतच्या समस्या यावर चर्चा झाली, असेही पवार म्हणाले आहेत. यावेळी त्यांना राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, सध्या पक्षासमोर अध्यक्षपदासाठी अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसताना राजीनामा देण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही.       

राहुल गांधींना पर्याय शोधणे वाटते तितके सोपे नाही कारण की...

राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. दरम्यान राहुल गांधी आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. उल्लेखनिय म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. तर राष्ट्रवादीने ५ जागांवर विजय मिळवला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress President Rahul Gandhi meets NCP leader Sharad Pawar at Pawars residence in Delhi