पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अलवर गँगरेप प्रकरणःराहुल गांधींची पीडित कुटुंबीयांशी भेट, न्याय देण्याची दिली ग्वाही

राहुल गांधी (ANI)

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सकाळी अलवर जिल्ह्यातील थानागाजी येथे जाऊन सामूहिक बलात्कार पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राहुल यांच्याबरोबर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट हेही उपस्थितीत होते. 

'...तेव्हा मोदी मनमोहन सिंग यांची खिल्ली उडवायचे, आता लोक मोदींची खिल्ली उडवताहेत'

राहुल म्हणाले की, 'ही घटना (अलवर सामूहिक बलात्कार) ऐकल्यानंतर मी त्वरीत याबाबत अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली. हा माझ्यासाठी राजकीय मुद्दा नाही. मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यांनी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. त्यांना न्याय मिळेल.' दोषींविरोधात कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

अलवर जिल्ह्यातील थानागाजी ठाण्याच्या क्षेत्रात २६ एप्रिल रोजी पतीबरोबर दुचाकीवर जात असलेल्या महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ बनवला होता. याप्रकरणाची दखल घेण्यास उशीर केल्यामुळे पोलिस आणि राज्य सरकारवर मोठी टीका करण्यात आली होती. 

मी कधीच मोदींच्या कुटुंबीयांचा अपमान करणार नाहीः राहुल गांधी

पोलिसांनी या प्रकरणातील पाच आरोपी आणि याच व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचा आरोप असलेल्या आरोपीला यापूर्वीच अटक केली आहे.

मोदींना वाटते ढगाळ हवामानामुळे ते लोकांच्या रडारवर येणार नाहीत, प्रियांकांचा टोला