पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचाराविरोधात काँग्रेस काढणार शांतीमार्च

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक

दिल्ली हिंसाचार प्रकरणी बुधवारी काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. दिल्ली हिंसाचाराविरोधात काँग्रेस शांती मार्च काढणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते. या बैठकीमध्ये दिल्ली हिंसाचारात मृत्यू झालेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

दिल्लीत तातडीने लष्कर तैनात करा; केजरीवालांची गृहमंत्रालयाकडे मागणी

काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये दिल्ली हिंसाचाराविरोधात शांतीमार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस मुख्यालय २४ अकबर रोड येथून राष्ट्रपती भवनापर्यंत हा शांचीमार्च काढणार आहेत. या शांतीमार्चमध्ये काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहे. दरम्यान, सर्व सदस्यांना काँग्रेस मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. या शांतीमार्चमध्ये सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी या देखील सहभागी होणार आहेत.   

'दहशतवादी घाबरलेत म्हणूनच बालाकोटनंतर मोठा हल्ला नाही'

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीमध्ये शनिवारी रात्रापासून आंदोलन सुरु आहेत. या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५० पेक्षा अधिक जण यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये जळपास ५६ पोलिसांचा समावेश आहे. दिल्लीच्या जाफराबाद, मौजपूरसह अनेक भागांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे.

दगडफेकीत ठार झालेल्या गुप्तचर अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला